उन्हाळ्याची चाहूल लागली कि लगेच आठवण येते ती कैरीची. कैरीचे तसे बरेच पदार्थ बनवता येतात. पण त्यातल्या त्यात मला गुळांबा आवडतो. आंबट -गोड असा गुळांबा त्याची चव खूप चांगली लागते. . तुम्हाला हि नक्की आवडेल, करून पहा. त्यासाठी साहित्य आणि कृती वाचावीच लागेल ना तर मग हि घ्या आणि जरूर करून पहा .
साहित्य :-
- कैरीचे पातळ काप - २ वाटी
- दालचिनी - १ ते २
- गुळ- १ वाटी
- लवंग -४ ते ५
- मीठ चिमुटभर
कृती :-
एका पातेल्यामध्ये कैरीचे पातळ काप कापून घेणे व गॅस च्या बारीक फ्लेम वर ते काप परतणे व सतत ५ मिनिटे हलवणे. ५ मिनिटानंतर गॅस फ्लेम मध्यम करणे व त्यामध्ये दालचिनी, लवंग व चिमुटभर मीठ घालून पाणी थोडे आटे पर्यंत शिजवणे व शिजल्यानंतर गॅस बंद करणे. तयार झाला गुळांबा.
टीप :-
- तुम्हाला हवे असल्यास कैरी किसून घेतली तरी चालते .
- कैरी जास्त आंबट असल्यास गुळाचे प्रमाण वाढवणे.
- दालचिनी अखंड वापरण्याऐवजी बारीक पावडर वापरली तरी चालेल.
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .