पाट वडी
हि वडी
महाराष्ट्रात घरोघरी केली जाते. हा महाराष्ट्रीय पारंपारिक पदार्थ आहे. सण असो वा कोणताही कार्यक्रम हा पदार्थ हमखास असतोच. आणि तसा लागतो हि चविष्ट त्यामुळे तुम्हीही घरी करून पहा. मला खात्री आहे तुमचा हि आवडीचा पदार्थ बनेल.
साहित्य :-
- हरभरा डाळीचे पीठ - १ वाटी
- तेल – २ चमचे
- फोडणीसाठी मोहरी, जिरे ,हिंग,हळद
- आले-लसून मिरची पेस्ट – १ चमचा
- कोंथिबीर बारीक चिरलेली – पाव वाटी
- खोवलेले ओले खोबरे – पाव वाटी
- मीठ - चवीनुसार
कृती :-
प्रथम एका पातेल्यामध्ये २ मोठे चमचे तेल गरम करत ठेवणे.
तेल गरम होत आले की त्या मध्ये मोहरी,जिरे,हिंग,हळद व आले लसून मिरची पेस्ट घालणे व हालवणे. गॅसची आच मंद करणे.
नंतर त्यामध्ये दीड वाटीपाणी टाकणे. पाण्यात चवीनुसार मीठ टाकणे.
पाण्याला उकळी आल्या वर त्यामध्ये डाळीचे पीठ टाकणे व चांगले हलवून घेणे. गॅसची आच मंदच ठेवावी.
पिठाचा चांगला गोळा होतो. पिठाच्या गोळ्याच्या कडेने तेल सोडणे व ५ मिनिटे पिठाला झाकून चांगली वाफ आणणे.
५ मिनिटानंतर गॅस बंद करणे व पातेल्यातील पिठाचा गोळा तेल लावलेल्या तटावर पसरून थापणे [थोड जाडसर].
वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल खोबरे भुरभुरावे व परत थोडे थापावे. थंड झाल्यावर चौकोनी वड्या कापाव्यात.
टीप :-
- पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची आच मंद करावी मगच त्यात पीठ घोटावे.
- वडीसाठी घेतलेले डाळीचे पीठ चाळून घ्यावे.
- वड्या ताटावर थापताना खूप पातळ व खूप जाड थापू नयेत.
- ताटात वड्या थापताना पीठ गरम असतानाच थापावे.
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .