सहज एकदा केक खावासा वाटला बघितले तर घरी केक साठी लागणारे साहित्य कुठे आहे. मग सुचला रवा तर आहे ना घरी मग म्हटल याचाच करावा केक . मग बनला घरच्या घरी अप्रतिम केक तुम्हाला करायचा असेल तर बघा मग साहित्य आणि कृती.
रवा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:-
- दही - १/२ कप
- पिठीसाखर-१ कप
- तेल - १/२ चमचा
- बारीक रवा -१ १/२ कप
- मैदा -१/४ कप
- खायचा सोडा -१/२ चमचा
- बेकिंग पावडर -१/२ चमचा
- टूटीफ्रूटी -१/४ कप
कृती:-
दही आणि पिठीसाखर एकत्र करणे . हलवून एक सारखे करणे नंतर त्यामध्ये तेल घालून एकसारखे हलवणे नंतर त्यामध्ये रवा व मैदा घालणे १/२ टीस्पून बेकिंग सोडा घालणे एक सारखे करून ३० मिनिटे भिजत तसेच ठेवणे. ३० मिनिटांनी रवा मऊ भिजल्यामुळे मिश्रण घट्ट वाटल्यास त्यामध्ये १ ते २ चमचे दुध घालून थोडे पातळसर करावे खूप पातळ करू नये या मिश्रणा मध्ये बेकिंग पावडर व इसेन्सघालून हलवणे व टूटीफ्रूटी घालणे व गॅसवर कुकर प्री-हिट करून घेणे. मध्यम आचेवर ५० ते ५५ मिनिटे केक बेक करणे.
महत्वाची टीप:-
- दही ताजे व गोडसर घ्यावे.
- रवा व मैदा घातल्यानंतर मिश्रण अर्धा तास तसेच ठेवावे त्यामुळे रवा चांगला भिजतो व फुगतो.
- प्री -हिट केलेल्या ओवन मध्ये १५० डिग्री तापमानावर ४० ते ४५ मिनिटे बेक करणे.
- मिश्रण खूप पातळ करू नये.
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .