Authentic Maharashtrian Recipes:- Danagar.

Authentic Dish : डांगर


डांगर, Dangar, maharashtrian recipe ,marathi recipes, Authentic maharashtra.

                                                  


                                                   आजची रेसिपी थोडी भन्नाट आहे. खमखमित, चटपटीत ,तिखट या सगळ्याच मिश्रण आहे डांगर. याची करण्याची पद्धत हि सोपी आहे. तसेच साहित्य हि कमी लागत. त्यामुळे अत्यंत कमी वेळात हा झणझणीत पदार्थ तुम्ही बनवू शकता घरच्या घरी . मग बघून घ्या साहित्य आणि कृती :-




साहित्य :

  1. डांगराचे पीठ -१/२ वाटी
  2. बारीक चिरलेला कांदा- पाव वाटी
  3. बारीक चिरलेली कोथिंबीर
  4.  दही- २ चमचे
  5. चवीनुसार मीठ
  6. हिरव्या मिरच्या- १ ते २
  7. गरजेनुसार पाणी.


कृती:-

                                              एका छोट्या भांड्यामध्ये डांगरचे  पीठ  घेणे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची व दही घालून मिक्स करणे, वाटल्यास पाणी घालणे व थोडे रबरबीत पातळसर मिश्रणतयार करणे. चवीनुसार मीठ घालणे व वरून कोथिंबीर घालून चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाणे.



टीप :-

  1. हिरवी मिरची ऐवजी तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल.
  2. दही नसेल तर डांगर पीठ भिजवण्यासाठी फक्त पाणी वापरले तरी चालेल.
  3. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही वरून फोडणी करून घालू शकता  त्याची चव आणखी वाढेल.

डांगरचे पीठ कसे करायचे हवे असल्यास या लिंक वर क्लिक करा:- https://sumansurve.blogspot.com/2020/05/marathi-recipes-dangarache-pith.html

Post a Comment

0 Comments