Authentic Maharashtrian Food Recipe:- KADHI

कढी (Maharashtrian Curry)




कढी,KADHI,CURRY, MAHARASHTRIAN CURRY

                                                    


साहित्य :-

  1. दही १ वाटी जर ताक असेल तर २ वाटी
  2. बेसन -२ चमचे
  3. आले लसून व मिरची पेस्ट -१ चमचा
  4. कोथिंबीर- १ चमचा (बारीक चिरलेली)
  5. फोडणीसाठी तूप - १ चमचा
  6. कढीपत्ता- ४ ते ५ पाने
  7. मोहरी -१/२ लहान चमचा
  8. जिरे- पाव लहान चमचा
  9. हिंग -चिमुटभर
  10. हळद -पाव चमचा
  11. मीठ व साखर चवीनुसार

कृती :-

                                                दही असेल तर १ वाटी दह्यामध्ये / ताकामध्ये बेसन घालून मिक्स करणे, पाणी घालून ताक करून घेणे. नंतर गॅस चालू करून एका पातेल्यात फोडणीसाठी तूप गरम करून, त्यामध्ये मोहरी जिरे घालणे . मोहरी, जिरे तडतडल्यावर त्यामध्ये आले , लसून ,मिरची पेस्ट ,कडीपत्ता, हिंग, हळद घालून त्यामध्ये बेसन घातलेले ताक घालावे. नंतर सतत ढवळत  एक उकळी काढणे.  नंतर त्यामध्ये मीठ व साखर चवीनुसार घालून,कोथिंबीर वरून घालणे, आणि गॅस बंद करणे. तयार झालेली हि कढी भाताबरोबर चांगली लागते.


टीप :-

  1. जर तुम्हाला कढी दाटसर हवी असल्यास त्यामध्ये बेसनचे प्रमाण वाढवणे .
  2. तूपाऐवजी तेल वापरले तरी चालते पण तूपात फोडणी घातलेली कढी चवीला खूप छान  लागते.
  3. कढीसाठी घेतलेले दही ताजे असावे .
पुढची रेसिपी:-

Post a Comment

0 Comments