MARATHI RECIPES :- DADPE POHE

दडपे पोहे

Dadape pohe, दडपे पोहे


साहित्य :- 

  1. कांदे - २ (मध्यम आकाराचे )
  2. टोमॅटोबारीक चिरलेले - २
  3. पोहे २ मोठे चमचे
  4. हिरवी मिरची (बारीक चिरलेली )-२ ते ३
  5. हळद -१/२ टीस्पून
  6. कोथिंबीर बारीक चिरलेली - पाव वाटी
  7. भाजलेले शेंगदाणे -१० ते १२
  8. कडीपत्ता- १० ते १२ पाने
  9. चवीनुसार मीठ व साखर
  10. फोडणीसाठी - तेल १ मोठा चमचा मोहरी ,जिरे,हिंग 
  11. खोवलेले ओले खोबरे -३ मोठ्ठे चमचे.  

कृती :-

  •  एका बाउल मध्ये प्रथम पोहे घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा , टोमॅटो, ओले खोबरे कोथिंबीर व लिंबाचा रस घालून पोहे चांगले मिक्स करणे व १/२ तास झाकून ठेवणे त्यामुळे पोहे थोडे मऊ होतात.
  • १/२ तासानंतर फोडणीसाठी तेल १ मोठा चमचा गरम करणे त्यामध्ये हिरवी मिरची , मोहरी , जिरे ,कडीपत्ता, हिंग, शेंगदाणे हळद व चवीनुसार मीठ आणि साखर घालून गॅस बंद करून हि फोडणी पोह्यावर घालून व्यवस्थित हलवून घेणे .
  • तयार झाले दडपे पोहे. याची चव थोडी आंबट तीखट व चांगली लागते.



टीप:-

  1. दडपे पोहे करण्यासाठी आपण जाडे पोहे न वापरता पातळ पोहे वापरावेत.
  2. या पोह्या मध्ये कोथिंबीर भरपूर वापरावी.
  3. मीठ व साखर हे फोडणीसाठी म्हणजे तेलामध्येच टाकावेत.

पुढची रेसेपी:-

Post a Comment

0 Comments