LAL BHOPLYACHE "GHARGE"

घारगे [लाल भोपळ्याचे]





घारगे [लाल भोपळ्याचे], GHARGE, BHOPLA



साहित्य :-

  1. लाल भोपळा किसलेला – ४ वाट्या
  2. गुळ – १ १/२ वाट्या
  3. गव्हाचे पीठ – १ वाटी
  4. मीठ – चिमुटभर
  5. तळण्यासाठी तेल



कृती :-

                                    लाल भोपळ्याच्या बिया काढून साल न घेता सर्व भाग किसून घेणे. एका भांड्यात किसलेला भोपळा घेऊन गॅस चालू करणे. मध्यम आचेवर भोपळा चांगला परतून घेणे. १० मिनिटानंतर त्यामध्ये गुळ घालणे. गुळ घातल्यावर मिश्रणाला पाणी सुटेल हे पाणी आटवून घेणे व भोपळा चांगला परतून २० ते ३० मिनिटे शिजू देणे. भोपळा शिजल्यानंतर गॅस बंद करणे व मिश्रण पूर्ण थंड झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून चांगले मिक्स करणे व छोटे छोटे गोळे करून तेलाच्या हाताने प्लास्टिक पेपर वर पुरी सारखे थापून तेलात लालसर रंगावर तळून घेणे.



टीप:-

  1. भोपळा शिजवताना गुळामुळे सुटलेले पाणी पूर्ण आटवून घेणे थोडेच शिल्लक असेल तर चालते पण खूप पातळ वाटत असेल तर थोडे गव्हाचे पीठ वाढवले तर चालेल.
  2. घारगे थापताना खूप पातळ थापू नयेत थोडे जाडसर तळावेत म्हणजे छान फुगतात.  

Post a Comment

0 Comments