KANDA BHAJI ❤❤

कांदा भजी [खेकडा भजी]




साहित्य :-

  1. कांदे उभे चिरलेले – ४ 
  2. तिखट – १ चमचा
  3. मीठ – चवीनुसार
  4. बेसन – पाउण वाटी 
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली
  6. खायचा सोडा – पाव चमचा (लहान)
  7. तळण्यासाठी तेल – गरजेनुसार


कृती :-

                   प्रथम कांदे उभे व पातळ चिरून घ्यावेत व चिरलेल्या कांद्याला चवीनुसार मीठ, तिखट, खायचा सोडा, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घेणे. १५ ते २० मिनिटांनी कांद्याला थोडे पाणी सुटेल तेव्हा बेसन मिक्स करून घेणे गरज वाटल्यास त्यामध्ये थोडे पाणी घालणे. कढईमध्ये तळण्यासाठी तेल घेणे व चांगले तेल तापल्यानंतर मध्यम आचेवर भजी तळून घेणे.


टीप :-

  1. कांदा पातळ व उभा चिरणे.
  2. कांद्याला चांगले पाणी सुटल्यावरच बेसन मिक्स करणे.
  3. भजीच्या पिठात खायचा सोडा जरूर घालावाच.      

Post a Comment

0 Comments