मेथांबा [METHAMBA]🥭
साहित्य:-
- कच्ची कैरी- १ किंवा २ कप
- लाल तिखट - २ टेबल स्पून
- गुळ - पाउण वाटी
- मीठ - चवीनुसार
- मेथीचे दाने - १० ते १२
- फोडणीसाठी जिरे मोहरी आणि तेल १- मोठा चमचा
- हिंग- चिमुटभर
कृती :-
कैरी प्रथम स्वच्छ धुवून साल काढून त्याच्या पातळ व छोट्या छोट्या फोडी करून घेणे. नंतर गॅस वर पातेले ठेऊन त्या मध्ये तेल टाकणे तेल गरम झाल्यावर हिंग मोहरी जिरे घालून फोडणी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये मेथी दाने टाकणे. मेथी थोडी लालसरझली कि त्या मध्ये लगेच आंब्याच्या फोडी टाकणे व त्या चांगल्या परतणे व थोड्या वेळाने लाल तिखट व मीठ घालून परतणे. नंतर गरज असेल तर थोडे पाणी घालून आंब्याच्या फोडी ५ मिनिटे वाफावणे. ५ मिनिटानंतरत्या मध्ये गुळ टाकणे व परत ५ ते १० मिनिटे वाफवून घेणे. गुळामुळे ते मिश्रण पातळ होते. पाणी थोडेच आटवावे व थोडे पातळ असतानाच गॅस बंद करावा हा मेथांबा फ्रीज मध्ये ठेवल्यास ७ ते ८ दिवस टिकतो.
हा मेथांबा चवीला गोड आंबट ,तिखट चविष्ट लागतो.खासकर उन्ह्ळ्यात नक्की करून पहा.
पुढची रेसिपी:-
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .