AUTHENTIC MAHARASHTRIAN RECIPE :- SURALICHI VADI

सुरळीची वडी [सोप्पी पद्धत ] 



Suralichi vadi,सुरळीची वडी

                                        
                             

                               सुरळीची वडी म्हटलं कि माझ मन आपोआप बालपणी वळत. माझ्या आजीच्या हातची अत्यंत रुचकर अशी माझी प्रिय वडी  आणि आता माझ्या मुलग्याला खूप आवडते. हिला ताकातील वडी सुद्धा म्हणतात. चला तर मग पाहूया कशी बनवायची महाराष्ट्रीयन सुरळीची वडी.

 
साहित्य:-

  1. १ वाटी बेसन [हरभरा डाळीचे पीठ ]
  2. हळद -१/४ चमचा
  3. आले + मिरची  पेस्ट - २ चमचे
  4. मीठ चवीनुसार
  5. २ वाट्या ताक
  6. खोबरेल तेल
  7. ओले खोबरे
  8. कोथिंबीर
  9. फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग .

कृती :-                         
                                   १ वाटी बेसन पिठामध्ये प्रथम दोन वाटया ताक मिक्स करून घेणे. गाठी होऊ देऊ नयेत, हलवून एक सारखे मिश्रण करणे त्यामध्ये चवीनुसार मीठ ,हळद, आले - मिरची पेस्ट घालून एकसारखे ढवळून घेणे. कुकरमध्ये हे मिश्रण असलेले भांडे ठेवणे. गॅस मध्यम आचेवर करून ५ ते ६ शिट्या करणे. ५ ते ६ शिट्या झाल्यावर गॅस बंद करणे. १० ते १५ मिनिटांनी कुकर मधील भांडे काढून त्यातील मिश्रण परत हलवून एक सारखे करणे व हे मिश्रण गरम असतानाच ताटाला तेल लावून त्यावर चमच्याने पातळ पसरणे [चित्रात दाखवल्या प्रमाणे] व त्यावर खोबरे व कोथिंबीर पसरून सुरीने उभे काप करून ते काप गोल गोल फिरवून रोल करणे, नंतर सर्व रोल वर एक चमचा तेल गरम करून त्यात मोहरी जिरे हिंग घालून फोडणी ओतणे .


Suralichi vadi,सुरळीची वडी



टीप :-

  1. गॅस खूप मोठ्या फ्लेम वर ठेवून शिट्या करू नयेत. गॅस मध्यम फ्लेम वरच ठेवणे.
  2. शिट्या झाल्यावर, गॅस बंद झाल्यावरनंतर कुकर काढून एक सारखे हलवणे व पातळसर ताटामध्ये पसरणे.


करून पहा. तुमच्याही घरात सगळ्यांना नक्की आवडेल.

पुढची रेसेपी :-

Post a Comment

0 Comments