कलिंगडाची मजेदार रेसीपी 😋😋😋

 कलिंगडापासून टूटीफ्रूटी🍒🍒

TUTYFRUITY, कलिंगडापासून टूटीफ्रूटी, Watermelon Recipes




साहित्य:-
१] कलिंगडाचा पांढरा भाग [आपण कलिंगड खाऊन झाल्यावर जो भाग फेकून देतो तो कलिंगडाचा भाग त्याची हिरवी साल काढून घेणे ] :- दोन कप बारीक चौकोनी तुकडे.
२] साखर :-१ कप
३] खाण्याचे रंग :- लाल, पिवळा, हिरवा, भगवा .


कृती:- 
  • प्रथम कलिंगड कापून त्यातील लाल रंगाचा भाग काढून घेणे नंतर हिरवी साल चाकूने काढून घेणे व त्या पांढऱ्याभागाचे बारीक चौकोनी काप करणे.
  • गॅस वर ४ कप पाणी उकळत ठेवणे पाण्याला उकळी आल्यावर त्यात ते काप टाकणे१०-१५ मिनिटे ते काप तसेच उकळून घेणे.
  • ते काप पारदर्शक झाल्यावर गॅस बंद करून त्यातील पाणी काढण्यासाठी थंड होण्यासाठी चाळणीत ओतून ठेवणे आता दुसर्या एका भांड्यात १ कपसाखर घेणे व त्या मध्ये ३ कप पाणी घालून साखर विरघळून घेणे व चिकट पाक होई पर्यंत १०-१५ मिनिटे उकळणे.
  • नंतर गॅस बंद करणे व त्या मध्ये कलिंगडाचे काप घालणे. चार वेगवेगळ्या भांड्यामध्ये पाकासाहित थोडे थोडे हे मिश्रण घालावे. प्रत्येक भांड्यात एक-एक म्हणजे लाल, पिवळा,हिरवा,रंग घालणे.
  • ५ ते ६ तास असेच ठेवणे तो पाक चांगला मुरे पर्यंत ठेवावा. ५-६ तासांनी पाकातून कप काढूणे वेगवेगळ्या ताटात पसरवून उन्हात वाळवावा नंतर मिक्स करून बरणीत भरून ठेवावे.
    
TUTYFRUITY, कलिंगडापासून टूटीफ्रूटी, Watermelon Recipes
 

टीप:-
  1. कलिंगडाचे काप उकळून घेताना ते पारदर्शक होईपर्यंत शिजवणे.
  2. साखरेचा पाक चिकट करणे १० ते १५ मिनिटेच उकळणे खूप घट्ट करू नये.

Post a Comment

0 Comments