कैरीचे पन्हे
हल्लीच्या काळात कोल्ड्रिंक्स पिण म्हणजे नसत्या रोगांना निमंत्रण देणचं आहे. आणि त्यातल्या त्यात ह्या कडाक्याच्या उन्हात न पिता हि राहू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी बनवलेले पेय चांगलेच. त्यामुळे हि रेसीपी त्याच करिता आहे- "कैरीचे पन्हे". तसेच हे पन्हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेऊन १ महिना टिकते.
हवे तेव्हा त्या मध्ये थंड पाणी घालून पिऊ शकता.
साहित्य :-
- ३ ते ४
कैरी त्याची हिरवी साल काढून १ ते २ इंचाचे तुकडे
- वेलची पावडर
- मीठ
-
गुळ- २ वाट्या
कृती:-
कैरीची हिरवी साल काढून बारीक तुकडे करून कुकर मध्ये डब्यात उकडून घ्यावे. थोडे पाणी घालावे ३ शिट्या कराव्यात. कुकर थंड झाल्यावर शिजवलेल्या कैरीच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात काढून त्या मध्ये किसलेला गुळ वेलची व मीठ पावडर घालून फिरवणे. चांगले एकजीव करून घेणे. हे मिश्रण एका डब्यात काढून घेणे. एका ग्लास मध्ये २ चमचे घेऊन थोडा बर्फ व थंड पाणी घालून सरबत तयार करणे.
टीप:-
- कैरी शिजवताना त्याची हिरवी साल व कोय काढून तुकडे करून घेणे
- जर कैरी मोठ्या असतील तर कैरी शिजवल्या नंतर त्यांचा जेवढा गर निघतो त्याच्या दीड पट गुळ घालणे .
- कैरी घेताना त्या घट्ट बघूंन घ्याव्यात मऊ झालेली कैरी वापरू नये.
- कैरी जास्त आंबट असतील तर गुळाचे प्रमाण वाढवणे.
- जर तुमच्याकडे गुळ नसेल तर साखर चालते.
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .