Kairiche padarth:- AAMBA DAAL

 

आंबा डाळ [AAMBA DAAL ]



आंबाडाळ, aamba daal


आंबा डाळ हा एक कोशिंबिरीचा प्रकार आहे. महाराष्ट्रात हा पदार्थ चैत्र महिन्यातील हळदी कुंकू साठी केला जातो. हा महाराष्ट्रातील पारंपारिक पदार्थ आहे.

 

साहित्य :-

  1. कैरीचा कीस – १/४ वाटी
  2. हरभरा डाळ – १ वाटी
  3. हिरव्या मिरच्या- १ ते २
  4. फोडणीसाठी - मोहरी जिरे हिंग व तेल कडीपत्ता
  5. मीठ चवीनुसार


कृती :-


  • प्रथम डाळ ३ ते ४ तास भिजत ठेवणे. भिजवलेली डाळ घेऊन त्यातील पाणी काढून एका मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेणे त्यात हिरवी मिरची आणि कच्ची कैरी किसून मीठ व साखर चवीनुसार घालून मिक्सर मध्ये वाटणे.
  • थोडा सरभरीत वाटणे व नंतर एका बाऊल मध्ये काढून तेल गरम करून  कडीपत्ता , जिरे ,मोहरी,हिंग घालून फोडणी तडतडली कि वाटलेल्या डाळीवर ओतणे व मिक्स करणे आंबट – गोड तिखट चवीची हि डाळ खूप छान लागते.


आंबाडाळ, aamba daal


टीप:-

  1. डाळ मिक्सरला जास्त बारीक वाटू नये.
  2. या कोशिंबिरीत डाळ थोडी बारीक थोडी मोठी ठेवावी.
  3. हवे असल्यास कोथिंबीर वरून घालू शकता .
  4. डाळ वाटताना पाण्याची गरज असेल तर थोडे घालावे कारण कैरीचा कीस असल्यामुळे त्याला पाणी सुटते.

Post a Comment

0 Comments