Tandlachya pithache VADE

* तांदळाच्या पिठाचे वडे *

 

VADE,वडे, तांदुळाच्या पीठाचे वडे,tandalachyapithache vade


                             सारखे जर का बटाट्याचे वडे, कांदा भजी, बटाटे भजी, मिरचीची भजी हे प्रकार खाऊन कंटाळाला आला असेल तर हि रेसिपी तुमच्यासाठीच आहे. खरतर मुळात वेगळा काहीतरी खाण्यात गमंत असते. सारख्या त्याच त्याच गोष्टी खाण्यात काही अर्थ नाही त्यामुळे वेगळ्या वेगळ्या गोष्टी "ट्राय" करायला काय हरकत आहे. म्हणून तर हे तांदळाच्या पिठाचे वडे करून पहा.


साहित्य :-

  1. तांदळाचे पिठ- 1 वाटी
  2. बारीक चिरलेला कांदा - १
  3. हिरवी मिरची बारीक चिरून १ ते २
  4. कोथिंबीर बारीक चिरलेली
  5. मैदा -२ चमचे
  6. आले किसलेले -२ चमचे
  7. तळण्यासाठी तेल
  8. चवीनुसार मीठ


VADE,वडे, तांदुळाच्या पीठाचे वडे,tandalachyapithache vade


कृती :-

  • एका पातेल्यात १ वाटी पाणी उकळत ठेवावे. पाण्याची उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदळाचे पिठ घालून चांगले ढवळून पिठ एकसारखे हलवून गॅस बंद करून पिठ झाकून ठेवावे.
  • १० मिनिटानंतर पातेल्यातील तांदळाच्या पिठाची उकड एका भांड्यात काढून त्यामध्ये वरील सर्व साहित्य म्हणजे दोन चमचे मैदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा, मिरची आणि किसलेले आले हे सर्व घालून चांगले मिक्स करणे.
  •  आपण भजीसाठी जसे पीठ करतो तसे करावे गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालून घ्यावे.
  • आता गॅस वर वडे तळण्यासाठी तेल तापत ठेवणे. तेल कडकडीत तापल्यावर त्यात छोटे छोटे गोळे सोडून वडे तळून घ्यावेत.


 

 

 


 

Post a Comment

0 Comments