KUNDA

कुंदा

कुंदा, KUNDA








साहित्य :-


  1. २ लिटर दुध
  2. साखर – १ १/२ वाटी
  3. दही- १वाटी




कृती:-


  • प्रथम पसरट असे जाड बुडाचे भांडे घेऊन त्यामध्ये दुध ओतणे व गॅस चालू करून दुध तापत ठेवणे. दुध उकळत आले कि गॅस मध्यम करून सतत हलवत दुध आटविणे.
  • दुधावर साय येत असेल असे वाटले तर पळीने ती  दुधात मिक्स करणे व सतत ढवळत राहणे.
  • जवळपास २५-३० मिनिटानंतर दूध घालून सतत ढवळत राहणे. जसे जसे दही दुधात मिसळेल तसे तसे दूध हळू हळू फाटेल त्यावेळी १ वाटी साखर मिसळणे व सतत ढवळत राहणे.
  • दुधातील दह्यासारखाभाग व पाणी असे वेगळे वेगळे दिसेल दुधातील पाणी आटेपार्यंत आपल्याला सतत हलवावे लागेल. 
  • दुधातील पाणी आटेपर्यंत दुसरया गॅस वर एका फ्राय पॅन मध्ये १/२ वाटी साखर पाणी न घालता कॅरमलाईज करून घेणे व हि कॅरमलाईज केलेली साखर हळू हळू आटवत ठेवलेल्या दुधात घालून पुन्हा सतत हलवून पूर्ण आटेपर्यंत गॅस वर ठेवणे पूर्ण पाणी आटल्यावर तयार झालेला कुंदा प्लेट मध्ये सर्व करावा.



कुंदा, KUNDA

टीप:-

  1. तळापर्यंत चमचा घालून दुध सतत धवळणे.
  2. कॅरमलाईज साखर गरम दुधात घालताना काळजीपूर्वक घालावे.
  3. दही घट्ट व गोड वापरावे.

   

Post a Comment

0 Comments