कैरीचे चटपटीत लोणचे [धावते लोणचे]
साहित्य :-
- कैरी -१
- तेल – २ चमचे (लहान)
- फोडणीसाठी मोहरी - १/२ चमचा
- जिरे – पाव चमचा
- तिखट- १/२ चमचा
- मीठ – चवीनुसार
- गुळ – १ चमचा
- हिंग – चिमुटभर
कृती :-
प्रथम कैरी स्वच्छ धुवून त्याचे बारीक चौकोनी तुकडे करून
घेणे. एका छोट्या भांड्यात तेल तापत ठेवणे. तेल तापले कि त्यामध्ये मोहरी, जिरे,
हिंग, मीठ, तिखट घालणे. फोडणी चांगली तडतडली कि गॅस बंद करणे व फोडणीमध्ये गुळ
घालणे व कैरीच्या फोडी घालून एक सारखे हलवणे.
टीप :-
- कैरी घेताना घट्ट घ्यावी .
- कैरी जास्त आंबट असेल तर थोडे गुळाचे प्रमाण वाढवणे.
- हे लोणचे लगेच संपवावे.
- फोडणी कोमट असताना कैरीच्या फोडी घाल्यावत.
0 Comments
काही विचारायचे असल्यास कमेंट करा .